| कर्जत | प्रतिनिधी |
विजयादशमीच्या मुहूर्तावर कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अगदी 72 – 73 वर्षांचे ज्येष्ठ खेळाडूही उत्साहात उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वच जण हास्य विनोदात रंगून गेले होते.
दहिवलीमधील बाल गोपाळ क्रीडा नगरी येथे क्रिकेट हंगामाच्या शुभारंभाचे आयोजन केले होते. संघटनेचे मार्गदर्शक मधु सुर्वे आणि रणजीत जैन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शशांक शेट्टी, गजेंद्र दांडेकर, विनायक परांजपे, सुनील जाधव, शिरीष दिघे, महेंद्र निगुडकर, राजु जैन, राजेश लाड, दिनेश कडू, समीर चव्हाण, विराग फाटक, सचिन मनोरे, सुरेश मोहिते, सुनील खातु, विकास चित्ते आदी उपस्थित होते.
राजेश लाड यांनी जुन्या आठवणी काढताना स्व. गिरीश सुर्वे यांस संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्ष शशांक शेट्टी यांनी फोर्टी प्लस क्रिकेट खेळाचा आनंद घेत एक धाव आरोग्यासाठी व पुन्हा एकदा तारुण्याकडे तसेच खेळामधून एक पाऊल समाजासाठी आपली संघटना नेहमीच कार्यरत राहील व फोर्टी प्लस क्रिकेट खेळण्यासाठी कर्जतमध्ये मैदान उपलब्ध व्हावे. यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या हंगामात फोर्टी प्लस क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत, कोणतीही दुखापत न होता आरोग्य निरोगी आरोग्य राहण्यासाठी मैदानावर खेळत राहू असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दिपकांर सालये, तुषार गोरे, किरण देशमुख, समीर चव्हाण, मंगेश म्हसे, विशाल निमकर्डे, सुजित पवार, राकेश गुप्ता, रमेश मिसे, जय उतेकर, पार्थ दांडेकर, भव्य सुर्वे, भाई जाधव, दिव्य सुर्वे, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.







