| पनवेल | वार्ताहर |
क्रिप्टोमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यास नफा होईल, असे सांगून 21 लाख 45 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुधाकर संजीव मगविरा यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी या खारघर येथे राहत असून, त्यांना सुधाकर मगविरा यांनी क्रिप्टोमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यास सांगून त्यात नफा होणार असल्याचे सांगितले. त्यांनी आयडी बनवून 1 लाख इन्व्हेस्ट केले तर 3 लाख रुपये नफा होईल, असे सांगितले. त्यानुसार शेट्टी यांनी 21 लाख 45 हजार रुपये गुंतवले. 7 महिन्यांपासून त्याने काही पैसे दिले नाहीत. त्याच्या राहत्या घरी गेले असता तुमचे सर्व पैसे परत करू, असे आश्वासन दिले. त्यानंरत वारंवार गुंतवलेले पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर फोन घेणे बंद केले. त्यामुळे त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.







