| पनवेल । वार्ताहर ।
आरबीआयच्या ट्रेझररमार्फत जुन्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने गुजरात वापी येथील एका व्यावसायिकाकडून तब्बल 3.50 करोड रुपयांच्या नोटा घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे या टोळीने व्यावसायिकाला त्यांच्या नोटा परत देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी 50 लाखांचे दोन चेकसुद्धा घेतले आहेत. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले व्यवसायिक बाबुजयेशसिंग ठाकूर (45) हे गुजरातमधील वापी येथे राहणारे आहेत. त्यांचा रोड इन्फ्रास्ट्रक्चर व क्वॉरीचा व्यवसाय आहे. ठाकूर यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांना दिवाळी सणानिमित्त पगार व बोनस देण्यासाठी रोख स्वरूपात नवीन नोटा हव्या होत्या. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकूर यांचा मित्र अजय मिश्रा याने विशाल विरोजा याची भेट करून दिली होती. त्या वेळी विशाल याने मुंबईतील मोईन कादरी याची आरबीआयच्या ट्रेझररच्या माध्यमातून नवीन नोटा मिळवून देणार असल्याचे सांगितले होते.