प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक: दोघांवर गुन्हा

| महाड | प्रतिनिधी |
राजेवाडी येथील राहणार्‍या एका महिलेचा मुलाला पुणे कोथरूड येथील एम आय टी कॉलेज येथे अ‍ॅडमिशन करून देण्यासाठी महाड शहरात दोघाजणांची तीन लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक जून 2022 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान झाली आहे. सुरेया महमूद इक्बाल काझी-55 रा.राजेवाडी यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी दिपीका राजेंद्र उर्फ राजन पवार रा.विरेश्‍वर मंदिर बाजूला महाड आणि नितीन जाधव किंवा नितीन शिंदे रा महाड पूर्ण नाव माहीत नाही या दोघांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या मुलाला पुणे कोथरूड येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कॅम्प्युटर सायन्स या कोर्स करीता ऍडमिशन मिळून देतो असे सांगून फिर्यादी यांना विश्‍वासात घेतले, आणि त्यांच्या कडून ऑन लाईन मनीट्रान्स्फरद्वारे व रोख स्वरूपात 3 लाख 51 हजार 500 तसेच 20 हजार रुपयांचा लॅपटॉप असे 3लाख 71 हजार पाचशे रुपये फिर्यादी कडून घेतले मात्र आपल्या मुलाला ऍडमिशन अध्याप मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी काझी यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना जून 2022 ते सप्टेंबर 2022या दरम्यान घडली. तक्रारी नुसार आरोपीं विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 420/406/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version