आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
। महाड । प्रतिनिधी ।
बनावट दागिने गहाण ठेऊन पतपेढ्यांची फसवणूक करण्याची घटना महाड शहरांमध्ये घडली असून येथील शिवकृपा सहकारी पतपेढीची फसवणूक करणार्या आठ जणांच्या विरोधामध्ये महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
महाड शहरातील शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई शाखा महाड शाखेमध्ये मुल्यांकनाचे काम करीत असलेला विठोबा सागवेकर रा.शिंदेकोंड महाड यांच्या संगनमताने सदीप किसन पाथरे रा.नाते, संदेश संदिप पाथरे रा.नाते, राजेंद्र विठ्ठल यादव रा.विन्हेरे, ऋतुजा राजेंद्र जाधव रा.महाड, राजेंद्र किसन जाधव रा.महाड, शिल्पा अशोक नगरकर रा.सरेकर आळी ता.महाड, अक्षय मंगेश बामणे रा.काचले सर्व आरोपी महाड तालुक्यातील असून या सर्वांनी संगनमताने खोटे दागिने पतपेढीमध्ये गहाण ठेऊन 55 लाख 87 हजार 300 रुपयांची फसवणूक केली आहे. पतपेढीमध्ये खोट दागिने गहाण ठेऊन फसवणूक करण्यात आली असल्याचे आढळून आल्यानंतर पतपेढीचे प्रभाकर दशरथ जाधव यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी भादवी 408, 420, 465, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.