मा.आ.पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। कुसुंबळे । वार्ताहर ।
कोएसो लक्ष्मी शालीनी कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय पेझारी येथे नुकताच प्रा.डॉ.संगीता चित्रकोटी लिखित विज्ञान एक कला या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा मा.आ.व कोएसोचे ज्येष्ठ संचालक पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आला. सदर हे पुस्तक पाठ्यक्रमासाठी अभ्यासण्यात येणार आहे.
स्व.दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कोएसो लक्ष्मी शालिनी कला व विज्ञान महिला महाविद्यालय पेझारी आणि आभाळमाया सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी व शिक्षण घेत असणार्या मुलींसाठी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आ.पंडित पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अॅड.दत्ता पाटील यांच्यावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा कॉलेज मार्फत आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. संगीता चित्रकोटी लिखित विज्ञापन एक कला या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. तसेच सदरील पुस्तक हे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्राध्यापक वर्गाला देखील उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रभारी प्रा.डॉ.दिलीप पाटील, कोएसो.व प्रशासकीय अधिकारी अशोक गावडे, मुख्याध्यापक फडतरे, यशवंत मास्तर, माजी मुख्याध्यापक रणदिवे, प्रा. दिलीप सोनावणे, प्रा.बिरारे, प्रा.बांगर प्रा.डॉ.भटू वाघ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.