। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक महिला दिन आणि स्त्री क्रांतीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे 125 वे स्मृतीदिन वर्ष या दोन्हींचे संयुक्तिक औचित्य साधून, नेहरू युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग, जीवनज्योती महिला ग्रामसंघ, कुरुळ-अलिबाग आणि ओएसिस : बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.14) युवती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषीवल माध्यम आहे.
या शिबिरात करिअर गाईडन्स, स्व-संरक्षण प्रशिक्षण, युवा अवस्थेतील प्रश्न आदींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. ग्रुपग्रामपंचायत कुरुळचे मंगल कार्यालय, कुरुळ-अलिबाग येथे सकाळी 9 ते सायं. 04:30 या दरम्यान संपन्न होणार असून, मात्र 30 स्त्री प्रशिक्षणार्थींना प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. तरी अधिक माहितीकरिता नुपूर जैन 9322538144, ऋतुजा पाटील 956175801, यज्ञेश पाटील 9011625057 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकंकडून करण्यात आले आहे.