| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
विजेच्या धक्क्याने शहाबाज येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी (दि.1) कातळपाडा येथे घडली असल्याची महिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ पाटील (27) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण वेल्डींगचे काम करणारा आहे. नेहमीप्रमाणे कातळपाडा येथे वेल्डींगचे काम करीत होता. अचानक त्याला विजेचा जोरदार झटका लागला. त्यामुळे तो बेशुध्द झाला. ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्याला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून तो अगोदरच मृत असल्याचे सांगितल्याची माहिती प्राप्त झाली. या घटनेने शहाबाज परिसरात शोककळा पसरली आहे.






