| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी 106 तरुणांनी हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे. या हुतात्मा चौकात महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंगा झेंडा फडकावून तसेच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील पत्रकारांची समाजसेवी संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या हुतात्मा स्मारक समितीचे वतीने हुतात्मा स्मारक उभे आहे.
हुतात्मा स्मारक समितीचे वतीने महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचे औचित्य साधून हुतात्मा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यांना जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हुतात्मा झालेल्या 106 हुतात्मा यांच्या स्मारकाला वैद्यक क्षेत्रातील डॉ. हेमंत शेवाळे आणि नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर कर्जत तालुक्यातील 46 स्वातंत्र्यसैनिक यांच्या नामफलक यास शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर आणि मनसेचे शहर अध्यक्ष सुभाष नाईक यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांचे हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला.







