लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।

अल्पवयीन तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवून ती गरोदर राहिली आणि तिच्यासोबत लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी अरबाज सलीम शेख (26) राहणार वडघर याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अल्पवयीन तरुणी सोबत अरबाज शेख याने शारीरिक संबंध ठेवून फोटो घरच्यांना पाठवण्याची धमकी दिली आणि तिच्यासोबत वारंवार शरीर संबंध ठेवले आणि ती यात गरोदर राहिली. लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version