पोलीस असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक

। पनवेल । प्रतिनिधी ।

पोलीस असल्याचे सांगून 4 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2025 ते 2026 पर्यंत आरोपी प्रणव उर्फ संतोष वाळुंजे (राहणार तळोजा), महादेव कोंडीलकर (रा. जांभिवली), नथुराम पवार (रा. रसायनी) यांनी पोलिसांचे कपडे घालून पोलीस असल्याचे फिर्यादी सत्यवान वसंत घरत (रा. आर वन करंजाडे) यांना भासवले आणि फिर्यादी सत्यवान घरत यांचे लोकांकडे असलेले रक्कम काढून देतो असे सांगून त्या बदल्यात त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणतीही रक्कम वसूल करून न देता त्यांची फसवणूक केली. तसेच सत्यवान घरत यांच्या ओळखीच्या लोकांकडून त्यांच्या नावाने दोन लाख 75 हजार रुपये घेतले आणि ती रक्कम देखील त्यांना न देता त्या रकमेचा अपहार केला.

Exit mobile version