शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

। रायगड । प्रतिनिधी ।

सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह हे सुधागड तालुक्यातील राम मंदिर रोड तळ्याशेजारी कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसुचीत जाती 80 टक्के, अनुसुचीत जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटूबांतील विद्यार्थीनी 5 टक्के, विशेषमागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के असे आहे.

प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून रुपये 2 लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, विद्यार्थीनींकरिता रुपये 1 लाख 50 हजारच्या आत असावे. तसेच, ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2023-24 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते पासबूक, रहिवासी दाखला, पासपोट आकाराचे दोन छायाचित्र, आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह एम.जे.नरहरे यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल कदम यांनी केले आहे.

Exit mobile version