। अलिबाग । वार्ताहर ।
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, पंचशिल नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळ, ता.महाड येथे 100 मुलांचे शासकिय वसतिगृह कार्यरत आहे. शासकीय वसतिगृहात गरीब हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत अनुसूचित जाती- 80%, अनुसूचित जमाती 3%, विमुक्त जाती, भटक्या जमाती 5%, विशेष मागास प्रवर्ग 2%, आर्थिकदृष्ट्या मागास 5%, अनाथ 3% अपंग 2% असे आरक्षण आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशिताकरिता लेखन साहित्याकरिता 4 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.500 निर्वाहभत्ता, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेष भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट/शैक्षणिक सहल भत्ता, अॅप्रन भत्ता देण्यात येईल.
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व भागांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता रु.2 लाख 50 हजार च्या आत असलेले तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखाच्या आत असलेले प्रमाणपत्र, अर्जासोबत संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांच्या सहीचा सन 2021-22 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकार्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, बँक खाते नोंदवहीची (पासबूक) झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स ही कागदपत्रे या वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक आहेत.
वसतिगृहात राहाणार्या मुलांकरिता प्रवेश इ.08 वी पासून पुढे आणि मांग, मेहतर, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुलांकरिता इ.5 वी पासून प्रवेश देण्यात येतो. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. तरी अधिक 7507269014 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाडचे गृहपाल अनिल मोरे यांनी केले आहे.