। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे ऑफलाईन फॉर्म भरण्याकरिता व वसतिगृहाच्या अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग उज्वला गुजेला (मो.9545390255) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.