शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींना मोफत प्रवेश

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरात राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. यावर्षी वसतिगृहामध्ये सन 2022/23 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास भटक्या जमाती इत्यादी संवर्गात इयत्ता आठवीपासून व भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनींना इयत्ता पाचवीपासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल, असे शासकीय मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल एस.ए. सावंत यांनी कळवले आहे.
महाड येथील मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शालेय 30 जागा, अकरावी आणि बारावीच्या 15 जागा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या 15 जागा, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 15 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल, असे श्रीमती सावंत यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी गृहपाल एस.के. सावंत (9423092822) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version