नागोठण्यातील सहस्त्रबुद्धे वसतीगृहात गरजूंना मोफत प्रवेश

। नागोठणे । वार्ताहर ।
डॉ. नेल्सन मंडेला निवासी शासन मान्य शाळेला 30 वर्ष पुर्ण झाली या निमित्ताने संस्थेच्या संचालक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी गैर विजाभज संवर्गातील सर्व जाती जमाती दरम्यान समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वसतीगृहात मोफत पहिली ते दहावी सेमी इंग्रजित शिकणार्‍या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे.
या शाळेत 120 विद्यार्थ्यांना जेवणाची सोय शासनाकडून केली जाते . त्यामुळे अन्य जातीजमाती व धर्माचे आर्थिक दृष्ट्या दुबळे आणि दर्‍याखोर्‍यातिल ग्रामीण आणि मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीत राहणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज आणि शैक्षणिक वातावरण अभावी गळतीचे प्रमाण मोठे आहे. म्हणून संस्थेच्या संचालकाने सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना नागोठणे येथील समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात मोफत प्रवेश देत असल्याचे डोंगरगावकर म्हणाले. कोकण आणि एमएमआरडी क्षेत्रातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी नवी मुंबईतील सुप्परक भवन, प्लॉट नं. 52, से 19 खारघर नवी मुंबई येथील संपर्क कार्यालय अथवा समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृह,नीलंबरी भवन, नागोठणे रेल्वे स्थेशन जवळ,नागोठणे, ता रोहा, जि. रायगड येथे जन्म तारखेचा दाखल,फोटो सह पालकाने प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेश घ्यावा असे आव्हान प्रा डॉ. जी. के.डोंगरगावकर यांनी केले आहे .

Exit mobile version