| पाली/वाघोशी | वार्ताहर |
सुधागड मराठा समाज या संस्थेच्या वतीने इयत्ता 10 वी 12 ते पदवीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअरचा वेगवेगळ्या वाटा समजून घेण्यासाठी रविवारी (दि. 23) दुपारी ठीक 1.30. वाजता सुधागड तालुका मराठा संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरास महाराष्ट्रराज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र, करिअर मेकर्स अकॅडमि मुंबई, तथा झी 24 तास, साम मराठी, दूरदर्शन (सह्याद्री) या वृत्त वाहिन्यांनावर करिअरचे करिअर विषयक मार्गदर्शन करणारे प्रा. संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिरास आपल्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांनी स्व. स. स. साजेकर सभागृह मराठा समाज भवन, पाली-शिळोशी रोड पाली, ता.सुधागड जि. रायगड येथे उपस्थित राहण्याचे आव्हाहन मराठा समाज संस्थेचा वतीने आणि संस्थेचे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे, शिक्षण समिती प्रमुख प्रा. संतोष भाईर यांनी केले आहे.