| पनवेल | वार्ताहर |
रुधिरसेतू सेवा संस्था, राजस्थानी महिला मंडळ पनवेल आणि इंनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक पनवेल येथे मोफत मोतीबिंदू परीक्षण शिबीर घेण्यात आले. रुधीरसेतुच्या नेत्रसेवा विभागाचे पहिलेच शिबीर म्हणून हे एक मोठे यश होते. या शिबिराचा एकूण 250 नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात मोतीबिंदूसह व्हिजन चाचणी घेण्यात आली आणि ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मोफत चष्मे वितरीत करण्यात आले. सर्व रुधीरसेतू व राजस्थानी महिला मंडळ, पनवेल कार्यकर्ता यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले.