दहिवलीत मोफत दंतचिकित्सा शिबीर


टीम परिवर्तन व मान सन्मान प्रतिष्ठाणचा उपक्रम
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
टिटवाळा येथील दहिवली या गावात नुकताच टीम परिवर्तन व मान सन्मान प्रतिष्ठाण या युवकांच्या माध्यमातून तसेच अथक प्रयत्नांतून अनोखा दंत तपासणी व दंतचिकित्सा शिबीर घेण्यात आला. या शिबिराला येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला कल्याण येथील दंत चिकित्सक डॉ. नेहा डोंगरे खडकबाण, डॉ. किरण जाधव आणि डॉ. अदिती माळुजंकर यांनी जमलेल्या सर्व मुलांची आणि नागरिकांच्या दातांची तपासणी केली. लहान मुलांनी प्रामुख्याने आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी, दिवसांतून किती वेळा दात घासावेत आणि कशा पद्धतीने घासावेत यांची प्रात्यक्षिके यावेळी मुलांना समजावून सांगितले. या दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन टीम परिवर्तन व मान सन्मान प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी 100 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि त्याचबरोबर सर्वांना मोफत पेस्ट आणि ब्रशचे वाटप यावेळी करण्यात करण्यात आले. यावेळी मान सन्मान प्रतिष्ठाणचे भावेश पैठणे, सुमित त्रिपाठी, संजय जांगळी, मालोजी बोडके, हर्षद फाले, अतुल राऊत उपस्थित होते.

Exit mobile version