| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोज शेकडो पर्यटक ये-जा करीत असतात. येणार्या पर्यटकांकडून किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क घेतले जाते. दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सन्मानार्थ उद्या शुक्रवारी (दि. 8) येणार्या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे आकारले जाणारे प्रवेश शुल्क माफ असणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी दिली आहे. किल्ले रायगड, कुलाबा आणि जंजिरा या किल्ल्यांवर गतवर्षी केवळ महिलांनाच प्रवेश शुल्क आकारले गेले नव्हते; परंतु यावर्षी महिलांसह पुरुषांनाही ही सवलत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उद्या जंजिरा किल्ल्यात मोफत प्रवेश
