मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या औचित्याने अलिबाग लायन्स क्लबच्यावतीने चौलच्या प्राचीन सुंदर नारायण मंदिरात मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. यावेळी शंभराहून अधिक नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. यात विविध प्रकारच्या नेत्र समस्येने ग्रासलेल्या 38 रुग्णांना अलिबागच्या लायन्स हेल्थ फाउंडेशन येथे मोफत शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. यात मोतीबिंदूचे 10, रेटिना 1 तर इतर 8 नेत्ररुग्णांचा समावेश होता.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सेकंड डिस्ट्रिक्ट व्हॉइस गव्हर्नर ला. प्रवीण सरनाईक, साईट फर्स्टचे डिस्ट्रिक्ट चेअरपसऱ्न एस.एन. मूर्ती, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, झोन चेअरपर्सन प्रितम गांधी, अलिबाग लायन अध्यक्ष अ‍ॅड. गौरी म्हात्रे, महेश कवळे, अंकिता म्हात्रे, अतुल वर्तक, सर्वश्री कवळे, अनिल म्हात्रे, अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, संतोष पाटील, गिरीश म्हात्रे, भगवान मालपाणी, संजय मोरणकर, मनोज ढगे, प्रकाश देशमुख, चित्रा वर्तक, डॉ. सुधीर पाटील, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागचे डॉक्टर्स, तंत्रज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक संघटना चौलचे अध्यक्ष सतीश मनोहर, राईलकर, सुधीर नाईक आदि मान्यवरांसह लायन्स सभासद, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version