माणगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

। माणगाव । वार्ताहर ।

माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि. 10) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्डजवळ माणगाव याठिकाणी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी 65 रुग्णांची तपासणी करून 23 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

माणगावात गेली दोन वर्षांपासून शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मेथा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात आतापर्यंत 2000 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजयशेठ मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक डॉ.प्रकाश पाटील, डॉ. इशा निरगुडकर, दिपाली म्हात्रे, अक्षता पार्टे, नियती शिंदे व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले. सदर शिबीर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मेथा परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा यांनी केले आहे.

Exit mobile version