| रसायनी | वार्ताहर |
मोतिबिंदूमुक्त मोहपाडा रसायनी अभियानांतर्गत आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि रोटरी क्लब पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराचे शनिवार, दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत मोहोपाडा श्री गणेश मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. मोतिबिंदूच्या ऑपारेशनसाठी येताना सोबत रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेऊन येणे तसेच बीपी शुगरच्या गोळ्या चालू असतील तर घेऊन यावे, असे आवाहन डॉ. प्रकाश पाटील यांनी केले आहे.