चिरनेर येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर

| चिरनेर | प्रतिनिधी |

पनवेल येथील डॉ. सुहास हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामपंचायत चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर गावातील श्रीराम मंदिरात दि. सात जून रोजी मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. विनोद पाचघरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने शिबिरात सहभाग घेतलेल्या चिरनेर परिसरातील स्त्री-पुरुष रुग्णांची मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी केली.

या शिबिरात चिरनेर परिसरातील जवळजवळ 100 हून अधिक स्त्री-पुरुष रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णांना मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले. तर बारा रुग्णांवर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. चिरनेर येथे भरविण्यात आलेल्या डोळे तपासणीच्या शिबिराला तसेच पनवेल येथे लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्ट येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांची सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, ग्रामसेवक महेश पवार तसेच चिरनेर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी भेट घेऊन, रुग्णांना योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version