शेकडो रुग्णांची मोफत नेत्रतपासणी

शंकरा आय हॉस्पिटल व विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व उद्योजक विजय मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि.13) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांच्या बाजूला असणार्‍या महेंद्र पितांबर मेथा यांच्या जागेत हॉलमध्ये जुने एसटी स्टॅन्डजवळ नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी नवीन 85 रुग्णांची तपासणी करून 27 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सदरचे शिबीर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते.

या शिबिरासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मेथा परिवारातर्फे विजय मेथा, मनीष मेथा, विधिता मेथा यांनी आभार व्यक्त केले. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील, डॉ. सिली, गुरुनाथ घुडे, नेहा कदम, अवंतिका रिकामे, ओंकार पाटील, ज्ञानोबा कांबळे यांनी सहकार्य करीत परिश्रम घेतले.

Exit mobile version