शेकाप नेते पंडीत पाटील प्रमुख अतिथी
| वाघ्रण | वार्ताहर |
ग्रुप ग्राम पंचायत वाघ्रण आयोजित शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील पुरस्कृत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे उद्घाटन शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र हरिश्चंद्र पाटील, माजी पं. स. सभापती प्रमोद ठाकूर, अनिल पाटील, सिद्धनाथ पाटील, आर बी पाटील, दयानंद म्हात्रे, पद्माकर पाटील, नितीश पाटील, विवेक पाटील ,माजी सरपंच उदय पाटील आदी उपस्थित होते .

प्रमुख अतिथी पंडीत पाटील यांच्या हस्ते कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त पत्रकार दिपक यशवंत पाटील आणि चित्रकार प्रथमेश राजन म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना चित्रलेखा पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढीत शेकापच्या माध्यमातून वाघ्रणला केलेली विकास कामे आणि राजकीय विचार परखडपणे मांडून त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या शिबीरात 300 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या सर्वांची नेत्र तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रचिकीत्सक डॉ. मंगेश नेमाण व डॉ. साहिल म्हात्रे यांनी केली. ज्या नेत्र रुग्णांना मोतीबिंदू आहे, त्यांना उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राथमिक शाळेच्या सभागृहात व नवीन इमारतीत झालेल्या या दोन्ही कार्यक्रमाना वाघ्रण आणि खारपेढांबे गावातील शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. शिबीर यशस्वी व्हावे यासाठी तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, गौतम पाटील, जयवंत पाटील, विवेक पाटील, प्रमोद पाटील, संजय पाटील, ग्रामसेवक सुवर्णा पाटील, आरोग्य अधिकारी मनिषा फड, मुख्याध्यापक श्याम पाटील, कर्मचारी संजिवनी पाटील, सारीका पाटील, युवा कार्यकर्ते क्षितिज पाटील, आदर्श पाटील , विद्याधर पाटील, गिरीश पाटील, बंदिनी पाटील, ललीता पाटील आदीचे सहकार्य लाभले .







