| म्हसळा | वार्ताहर |
मॅनकाईड फार्मा, स्वदेस फाउंडेशन व सार्वजनिक आरोग्य विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने डोळ्यांचे आजार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब व मधुमेह आजारासंबंधी मोफत आरोग्य तपासणी शिबिर म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावांमध्ये संपन्न झाले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मॅनकाईड फार्माचे आलोक कुमार व काळसुरी गावचे सरपंच राजेंद्र घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या प्रस्तावनेमध्ये स्वदेस फाउंडेशन चे संचालक डॉ. अजित कुमार सुडके यांनी आरोग्य शिबीर घेण्यामागचा उद्देश व कोणकोणत्या आजाराची तपासणी होणार आहे याबाबत मार्गदर्शन केले यानंतर मॅनकाईड फार्माचे आलोक कुमार यांनी मॅनकाईड फार्मा च्या कामाबाबत तसेच स्वदेस फाउंडेशन सोबत आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत यासंबंधी मार्गदर्शन केले त्याचबरोबर स्वदेस फाउंडेशन चे उप संचालक प्रसाद कुमार पाटील यांनी काळसुरी गाव विकास समिती करत असलेल्या कामाचं कौतुक करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर आरोग्य शिबिराला सुरुवात होऊन डोळ्यांचे आजार, ॲनिमिया, न्यूरोपॅथी सिकलसेल, उच्च रक्तदाब व मधुमेह या आजारासंबंधी 233 लोकांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल्ल एकाडे आणि त्यांची टीम यांनी मधुमेह ,उच्च रक्तदाब व सिकल सेल या संबंधित तपासणी करून उपचार केले तसेच मॅनकाईड फार्मा च्या टीमने न्यूरोपॅथी संबंधी लोकांची तपासणी करून शिबिरामधील करण्यात आलेल्या तपासणी सल्ल्याने लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील डॉ.केळसकर यांनी सुद्धा उपस्थिती राहुन लोकांची तपासणी केली. तसेच स्वदेस फाउंडेशन कडून लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्याची वाटप करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी काळसुरी गाव विकास समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, स्वदेस मित्र, आशा, पोलीस पाटील त्याचबरोबर स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री.अरुण भट्ट, विशाल वरुटे व व्यवस्थापक शिवतेज ढऊळ, समन्वयक कौस्तुभ कांबळे, विवेक गांधाळे यांनी विशेष प्रयत्न केले.