| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेढांबे येथे कलाविश्व फाऊंडेशन अलिबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर पेढांबे येथील समाज मंदिरात शनिवारी (दि.18) सकाळी 10 ते 1 दरम्यान पार पडले. या शिबिराचे उद्घाटन उन्नती हॉस्पिटल अँड आसीयू पनवेलचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत किल्लेकर यांच्या हस्ते श्री गणेश प्रतीमेला हार घालून करण्यात करण्यात आले. सोबत वाघ्रण येथील पत्रकार दिपक पाटील, कलाविश्वचे संस्थापक प्रणित म्हात्रे, ग्रा.पं. सदस्य रुपेश पाटील, डॉ. समाधान पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरात अनेकांची मोफत शुगर व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तर गुडघेदुखी, मुत्राशयाचे विविध आजार व अन्य आजाराच्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. शिबिरासाठी उन्नती हॉस्पिटलच्या स्टाफ नर्स वर्षदा पाटील, प्रणिता भोईर, को ऑर्डीनेटर प्रतिक पाटील यांनी कामकाज केले. तर अर्पिता सिलधनकर, अजित पाटील, अविनाश आचरेकर आदीनी सहकार्य केले. कलाविश्व संस्थापक प्रणित म्हात्रे आणि सदस्य रुपेश पाटील यांनी डॉक्टर व संपूर्ण टिमचे आभार मानले आणि शिबिराची सांगता झाली.
पेढांबे येथे मोफत आरोग्य शिबीर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606