पेण येथे मोफत आरोग्य शिबीर

| पेण | प्रतिनिधी |

गॅलेक्सी मल्टीस्पेशिलीस्ट हॉस्पिटल पेण आणि इनरव्हील क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने गॅलेक्सी हॉस्पिटल पेण येथे मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा म्हणून इनरव्हील क्लब ऑफ पेणच्या महिला सदस्यांनी मोठया प्रमाणात प्रबोधन केले होते. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी शिबीराचा जास्ती जास्त फायदा घेतला. या शिबीरामध्ये स्त्री रोग तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदय अदींसह वेगवेगळया 20 ते 25 आजारांच्या तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या. या शिबीरात डॉ. रत्नदिप गवळी, डॉ. राजेश टेलर, डॉ.सुनिल कांबळे, यांच्यासह गॅलक्सी हॉस्पिटलची पूर्ण टीम कार्यरत होती. शिबीरासाठी येणाऱ्या नागरिकांना मुस्कान झटाम, रुची महालकर, दिपश्री पोटफोडे, सुनंदा गावंड, प्रिया पाटील, सोनाली अहिरे पाटील, सरिता रणपिसे, वैशाली समेळ, प्रियंका मुखर्जी, तन्वी हजारे, श्वेता गावंड, नम्रता गुंजावळे, मेघना चव्हाण, दिपिका शिगवण आदी मेहनत घेत होत्या. या शिबीरात 150 ते 200 रूग्णांनी मोफत तपासणी तसेच औषधोपचार घेतला.


पेण शहरात गेली दोन वर्ष गॅलेक्सी हॉस्पिटल रुग्णसेवेचे काम अविरतपणे करत आहे. ग्रामीण भागात आरोग्याची सेवा पुरविताना ती व्यवसाय म्हणून न पुरविता ती सेवा म्हणून पुरवावी असा मानस पहिल्यापासून आमचा असल्याने आम्ही रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा मानूनच करतो. शेकडो रुग्णांना आरोग्य सेवा देत असताना कधी आम्ही नफा-तोटा याचा विचार केला नाही.

डॉ.रत्नदिप गवळी
Exit mobile version