। अलिबाग । प्रतिनिधी ।
ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब पोयनाड व माधवबाग खालापूर यांच्यावतीने पोयनाड पोलीस स्टेशन येथे मंगळवारी (दि.1) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी केले. या आरोग्य शिबिरात माधवबागचे डॉ. सिद्धेश महाडिक यांनी 60 जणांची आरोग्य तपासणी केली. इसीजी, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हार्टरेट, ऑक्सिजन आदींची तपासणी करण्यात आली. तसेच, डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शनदेखील केले. यावेळी पोयनाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दराडे, झोन चेअरमन दिलीप गाटे, प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील, प्रगती सिनकर, सुनील काकडे, रत्नकांत सूर्यवंशी, प्रमोद पाटील, प्रमोद राऊत, अरविंद अग्रवाल, महेंद्र पाटील, संतोष पाटील, कौस्तुभ जोशी, संजय जोशी, विनोद पाटील आदी सदस्य उपस्थित होते.