। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा औद्योगिक परिसरातील कुंभीवली येथील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविदयालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 150 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला.
विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विभाग, माधवबाग व टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त उद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुळ उद्देश म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षापासून सजग करणे आणि बाहेर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या चाचण्यांचे नियोजन मोफत करून देणे. या शिबिरात मोफत बीपी, शुगर, ईसिजी, शरीराचे वजन आणि उंचीनुसार असावे लागणारे वजन, पल्स ऑक्सिमीटर मार्फत हृदयाच्या ठोक्यांचे निदान, कॅन्सर सारख्या रोगाचे वेगवेगळ्या चाचण्यांमार्फत निदान करण्यात आले. शिबिरात 150हून अधिक नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी लाभ घेतला. यावेळी प्राचार्य डॉ.बी.आर. पाटील, डॉ.शंकर कदम, शिल्पा देशपांडे, नानासाहेब तांबे, अनिल पवार, डॉ.अंकुश पवार उपस्थित होते.