| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
डॉ. भट नर्सिंग होम व बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना शिबिरांतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात आले. हे शिबीर रविवारी (दि.1) सकाळी 10 ते 5 या वेळेत बल्लाळेश्वर देवस्थान जुने कार्यालय या ठिकाणी शिबिर पार पडले. या शिबिरात 57 नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये नाक, कान, घसा रुग्ण 12, अस्थीरुग्ण 35, मुतखडा व कॅन्सर रुग्ण 10 यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबाराचा लाभ घेतला. यात हाडाची शस्त्रक्रिया, कान-घसा शस्त्रक्रिया, मुतखडा शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी या आजारावर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेत बसणाऱ्या 20 नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया रोहा येथे होणार आहे. श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. उदा. रक्तदान शिबीर, शैक्षणिक संस्थांना मदत, वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येते, असे बल्लाळेश्वर देवस्थान अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले.







