। नेरळ । वार्ताहर ।
आधार असंघटित जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त असंघटित कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच कामगार कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात असंघटित कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली आरोग्य तपासणी मोफत करून घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कर्जत तालुक्यातील नामवंत डॉक्टर यांनी मोफत तपासणी केली. यात डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. निर्विदा गायकवाड, डॉ. प्रतिक कांबळी, डॉ. मयूर सरवदे, डॉ. सुनील ढवळे व डॉ. नेहा भालेराव समावेश होता. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने आधार असंघटित जनरल कामगार युनियनच्या कार्यालयाचे उद्घाटन अॅड. मधुकर त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंर आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेल्या असंघटित कामगारांना कामगार कायदेविषयक अॅड. त्रिभुवन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी युनियनचे अध्यक्ष अॅड. कैलास मोरे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, सरचिटणीस विद्यानंद ओव्हाळ, खजिनदार प्रसाद कांबळे, उपखजिनदार डॉ. सुनील ढवळे, सदस्य शरद गायकवाड, दर्शना पवार, संतोष जाधव, शरद गायकवाड, संजय तिखंडे आदींसह द.बा. जाधव, सुनील सोनावणे, वंचितचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, अशोक कदम, अनंता गायकवाड, डोंगरे, प्रदीप ढोले, कमलाकर जाधव, विकी जाधव, राजू ढोले, लोकेश यादव, वैभव कांबळे, भगवान जाधव, नगरसेवक उमेश गायकवाड हे उपस्थित होते.