पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी

| पनवेल | वार्ताहर |
दोन-दोन, तीन-तीन दिवस ड्युटी, कामाचा ताण तणाव, वेळी-अवेळी जेवण अशा अनेक प्रसंगांतून जात असताना तब्येतीवरही अशा गोष्टीचा परिणाम होत असतो. तरीसुद्धा लोकांसाठी दिवस-रात्र अखंड सेवा देणार्‍या पोलीस बांधवांचे बर्‍याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. एक बांधिलकी जपत पनवेलमधील वर्चस्व युवा फाऊंडेशनच्या नीता माळी व प्रसाद हनुमंते यांच्यातर्फे शुक्रवारी महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे येथे वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान, अप्पर पोलीस महासंचालक कुलावंत सारंगल, पोलीस अधीक्षक मुख्यालय अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, रायगड परिक्षेत्र, पोलीस उपअधीक्षक संदीप भागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरी मोरे, प्रभारी पोलीस उप निरीक्षक गणेश बुरकुल, वाहतूक शाखा, पळस्पे केंद्र यांच्या कार्यालयात फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सुश्रुशा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे, डॉ.राजेंद्र क्षीरसागर, डॉ. आयुशा खान, स्टाफ रमेश कदम यांनी पोलीस बंधावांच्या आरोग्य तपासकामी विशेष सहकार्य केले. यावेळी वर्चस्व फाऊंडेशनच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा, समाजसेविका नीता माळी, महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे कोकण विभाग अध्यक्ष, समाजसेवक प्रसाद हनुमंते, रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश चंदने, समाजसेविका स्नेहल खरे, ज्योत्स्ना माळी, अमित माळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version