| सुतारवाडी | वार्ताहर |
स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या वतीने कोलाड येथे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबीर शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह कोलाड आंबेवाडी नाका येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी विशेष डॉक्टर व तज्ज्ञांकडून ज्येष्ठ नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी व विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव तिवडे, डॉ. दर्शना वरूठे हे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयाची तापसणी, तसेच त्यांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना व मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.