नेत्र, मधुमेह, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह रक्तदान शिबीर
| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि सूर्योदय साखरचौथ गणपती मंडळ, थळ पालथी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र, मधुमेह आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासह रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
साखरचौथ गणपतीच्या औचित्याने लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे अलिबाग लायन्स अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी फीत कापून उद्घाटन केले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अश्रूग्रंथी, तिरळेपणा, मोतिबिंदू या नेत्रविकारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी संदर्भित करण्यात आले. यावेळी 80 रुग्णांची मोतिबिंदू तपासणी करण्यात येऊन, त्यातील चाळीस जणांना संदर्भित करण्यात आले. तर, 89 मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात येऊन, मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तर, 73 बॉटल्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करण्यात आले.
यावेेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रदीप नाईक, माजी अध्यक्ष अविनाश राऊळ, नितीन शेडगे, संजय माळी, प्रकाश देशमुख, समीर कवळे, विकास घरत, मनोज ढगे, संतोष पाटील, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबागच्या डॉ. शीतल कुडतलकर, इतर वैद्यकीय स्टाफ, तर सूर्योदय साखरचौथ गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश म्हात्रे, खजिनदार स्वप्निल म्हात्रे, इतर सदस्य, नेत्र आणि मधुमेह तपासणीसाठी आलेले रुग्ण तसेच थळ व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
