चाकरमान्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा

महामार्गावर चहा, नाश्ताही उपलब्ध
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण भाजपतर्फे गणेशोत्सवाला येणार्‍या चाकरमान्यांना चहा, नाश्ता, पाणी, आरोग्य सुविधा मोफत सुविधा कापसाळ हायवे रस्ता या ठिकाणी करण्यात आली आहे. सदरची व्यवस्था ही 28 ऑगस्टपासून याठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे.

दरवर्षी भाजपकडून हा उपक्रम राबविला जात असतो.ह्यावर्षी कोरोनाचे निर्बंध बर्‍यापैकी शिथिल झाल्याने भाजप चिपळूणतर्फे मंडप उभारण्यात आला आहे. येथे रात्रंदिवस ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर मुंबई चाकरमानी याचा लाभ घेत आहेत. याबद्दल प्रवाशी चाकरमान्यांनी भाजपच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत. यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Exit mobile version