। मुंबई । प्रतिनिधी ।
श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ-भायखळा यांच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील मुले व मुलींकरिता विनाशुल्क कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे दि. 22 ते 29 मे या कालावधीत सायं. 5 ते 8 या वेळेत हे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरात 10 ते 22 या वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येईल.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय खेळाडू मेघाली कोरगावकर-म्हसकर, मुंबई पोलीस संघाचे प्रशिक्षक एकनाथ सणस, राष्ट्रीय प्रशिक्षक सुहास जोशी, राष्ट्रीय खेळाडू अपर्णा शेट्टे यांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभणार आहे. तर, बंगळुरू बुल्सचे फिटनेस ट्रेनर रोहित यादव हे शिबिरार्थींना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवीण शिंदे-9819315911, एकनाथ सणस-7977259166 किंवा अपर्णा शेट्टे-9819233464 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.