| रामराज | प्रतिनिधी |
रामराज येथील रायगड जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण दोन महिने देण्यात आले शाळेतील 35 मुला- मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलींना स्वसंरक्षण तसेच कराटे बेसिक फाईट शिकवण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुला-मुलींना जय शोतो कान कराटे अँड स्पोर्ट अकॅडमी संघटनेचे अध्यक्ष संतोष रामचंद्र कवळे नवगाव तसेच रामराज रा. जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शिवशरण पाटील, भारतीय ऑलिंपिकची मान्यता असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केलेली श्रमिका श्रीधर पाटील महाजने यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय मेडलिस्ट आणि मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी कराटे ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक लायबा शेजाद अन्सारी रामराज, कराटे ब्लॅक बेल्ट उत्कृष्ट फायटर विश्वास कामी तसेच कराटे ब्लॅक बेल्ट शालेय मुंबई विभागीय गोल्ड मेडलिस्ट जिग्नेश गजानन कोळी अलिबाग, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







