इंदापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या कशेणे, इंदापूर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहिवासी भागात संचार करत असलेल्या बिबट्याचे दोन-तीन वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरणही झाले आहे. त्यामुळे लहान मुले, महिला तसेच गावातील नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. या बिबट्याने गावातील कुत्रे, मांजर नेऊन खाल्ले आहेत. त्यामुळे अधिकच भीती पसरले आहे. शेतकऱ्यांनादेखील आपल्या शेतात जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या बिबट्याला सापळा लावून पिंजऱ्यात जेर बंद करून दूर जंगलात सोडावे अशी, विपुल उभारे यांनी माणगावचे वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांना लेखी दिलेल्या निवेदनातून दिली आहे.

Exit mobile version