| रसायनी | प्रतिनिधी |
गोरगरीब व गरजूंना शासकीय कामात अडचणी येऊ नयेत, यासाठी ॲड. प्रमोद मैंदर्गीकर यांनी नोटरी कार्यालय सुरु केले आहे. प्रमोद यांच्या पत्नी चित्रा मैंदर्गीकर या समाजसेविका असून त्यांनी आदिवासी बांधव, विधवा महिला, नादार व दारीद्र रेषेखालील व्यक्ति यांना विनाशुल्क नोटरी करुन देणार असल्याचे बोलताना सांगितले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी सभापती रमेश पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी उपसरपंच दत्ता खाने, माजी उपसरपंच सदगुणा पाटील, सुवर्णा मुंढे, अजित सावंत, निलेश जुनघरे व राकेश खराडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मोहोपाडा येथे नोटरी कार्यालय सुरु झाल्याने रसायनी-पाताळगंगा परिसरातील नागरिकांना नोटरीसाठी खालापूर, कर्जत किंवा पनवेलला जाण्याची गरज लागणार नसून त्यांचा वेळ व पैसा देखील वाचणार आहे.
विनाशुल्क नोटरी कार्यालय सुरु
