। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील काराव -गडब ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंच मानसी मंगेश पाटील, व उपसरपंच मनोज म्हात्रे यांचेसहित सर्व सदस्यांनी कार्यभार स्वीकारला असून काराव गडब गावच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सरपंच यांनी येथे स्पष्ट केले. सर्व नवीन सदस्य निवडून आले . आहेत या सरपंच मानसी मंगेश पाटील, उपसरपंच मनोज म्हात्रे, सह नवीन सदस्य मनोहर पाटील, सिता पाटील, भाग्यश्री कडु ,दिपक कोठेकर, जगदीश कोठेकर,परशुराम मोकल , दिनेश म्हात्रे, कीर्ती म्हात्रे, संद्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे,दिपाली भोईर या सर्व सदस्य यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोवर्धन पाटील होते. सूत्रसंचालन यशवंत लागीं यांनी यावेळी माजी सरपंच अपर्णा कोठेकर, माजी सैनिक गोवर्धन पाटील, माजी सदस्य, ग्रामसेविका आर. एस धनावडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.