| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली शहरातील नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयासमोर मोकाट गुरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहर नियोजनाच्या केंद्रस्थानी असलेल्या या परिसरात गुरे मुक्तपणे फिरत असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, रस्त्यावर मोकाट गुरे मलमूत्र टाकत असून, त्याचा थेट परिणाम परिसरातील स्वच्छतेवर आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर होत आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायतीच्या दारातच ही स्थिती असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष सातत्याने जाणवत आहे. पाली बाजारपेठ, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, तहसील कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणीही हीच स्थिती दिसून येते. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नगरपंचायतीसमोर मोकाट गुरांचा सुळसुळाट

oplus_0