दोन कोटी ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

| मुंबई | प्रतिनिधी |

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर एसटी प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. 26 ऑगस्ट 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान केवळ 87 दिवसात राज्यभरातून 2 कोटी 08 लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर 26 ऑगस्ट 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यभरातून 2 कोटी 8 लाख 65 हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी 2 लाख 39 हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे . प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री. चन्ने म्हणाले.

Exit mobile version