| चणेरा | प्रतिनिधी |
गुरुकुल आरोग्य योगपीठ (सिद्धगिरी कणेरी मठ कोल्हापूर) व श्री. स.स. काडसिद्धेश्वर सांप्र. गुरुभक्त मंडळ चोरढे यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड तालुक्यातील चोरढे येथील हनुमान मंदिरात दोन दिवस विनामूल्य योग शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात योगाचे महत्त्व, उद्दिष्टे तसेच कराटे, लाठीकाठी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात चंद्रकांत खोत, राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्कार विजेते प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील योगपटू प्रशिक्षक उत्तम मांदारे यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन झाले. या शिबिराचे आयोजन श्री. स.स. काडसिद्धेश्वर गुरुभक्त मंडळ चोरढे यांनी केले होते. या शिबिराचे उद्घाटन चोरढे सरपंच तृप्ती घाग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य अनिल चोरढेकर, सदस्या प्रमिला चोरढेकर तसेच आगरी समाज मंडळ चोरढे अध्यक्ष सुनील घाग व चोरढे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अनिल चोरढेकर यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले. सदर योग शिबीर कार्यकामासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्वांना आयोजकांकडून खूप आभार व धन्यवाद देण्यात आले.