अलिबाग-रोहा रस्त्यासाठी नव्याने निविदा काढा; पंडित पाटील यांची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेली अनेक वर्षे वादात अडकलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामासाठी विद्यमान सरकारने जुन्याच निविदेवर काम सुरु केलेले आहे. तसे न करता सरकारने नव्याने निविदा काढून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करावी आणि रखडलेल्या कामाची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामासाठी मी आमदार असताना सरकारने परवानगी दिली होती. त्यासाठी तत्कालीन दरानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. पण अनेक कारणांनी या रस्त्याचे काम रखडले गेले. त्यानंतर आता सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने या रस्त्याचे काम सुरु केलेले आहे. अलिबाग-रोहा रस्त्यावर खानाव येथे खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात आहे. सरकारने हे काम अशा पद्धतीने न करता या रस्त्याच्या कामासाठी नव्याने निविदा काढणे गरजेचे आहे. कारण या रस्त्यासाठी ज्या अगरवाल कंपनीने ठेका घेतला होता त्यांनी हे का पूर्ण न करताच 18 कोटी अ‍ॅडव्हान्स घेऊन पळ काढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. आता सरकारने अगरवालच्या जागी दुसरा ठेकेदार उभा केलेला आहे. पण पहिल्या ठेकेदाराच्या रद्द न करता आहे त्या निविदेवरच काम सुरु केलेले आहे. यामुळे मुळ ठेकेदाराच्या कामाचा ठेका रद्द करुन सरकारने नव्याने निविदा काढून हे काम सुरु करावे, अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली.

नवीन रस्त्याच्या कामावरुनही पंडित पाटील यांनी सरकारकडे अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. नवीन ठेकेदाराला काम देताना कशाप्रकारे दर आकारले जाणार आहेत. त्याच्याकडून दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पावसाळा तोंडावर असताना हे काम पूर्ण करण्याची क्षमता त्या ठेकेदाराकडे आहे का आदी प्रश्‍नांची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. नाहीतर काम पूर्ण न करताच हा ठेकेदारही असाच बेपत्ता होऊन नागरिकांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यताही पंडित पाटील यांनी व्यक्त केली.

Exit mobile version