फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला महागात

| पनवेल | वार्ताहर |

फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे पनवेलमधील एका शिक्षिकेला महागात पडले. या भामट्याने आधी शिक्षिकेशी मैत्री करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची 30 लाख 96 हजार 865 रुपयांची फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2024 मध्ये डॉक्टर फेलेसिया प्रिन्स नावाच्या व्यक्तीने महिला शिक्षिकेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, जी तिने स्वीकारली. यानंतर भामट्याने गिफ्ट पाठवण्यास सांगितले. काही दिवसांनी दुसऱ्या महिलेने कस्टम अधिकारी असल्याचे भासवून फोन केला आणि तुमच्या नावावर पार्सल आले आहे, असे विविध शुल्क सांगून एकूण 30 लाख 96 हजार 865 रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. पैशाची मागणी सुरूच राहिल्याने शिक्षिकेला आपली फसवणूक झाल्याचे समोर आले.

Exit mobile version