| पनवेल |
पनवेलमधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृष्णा मेंगळ (वय 31, रा.अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याने वर्षभरापूर्वी पीडित शिक्षिकेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने वेगवेगळ्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 11 लाख 80 हजारांची रक्कम उकळली. पीडित शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केल्यानंतर तिने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. यामुळे पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.