| रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा एस.टी.स्थानकांतून थेट अलिबागकडे तसेच लांबपल्ल्याची बससेवा सुरू करण्यात आल्याने साळाव पुल दुरूस्तीच्या निमित्ताने रेवदंडा एस.टी.बस स्थानिकांस तात्पुरते पुर्वीचे गतवैभव लाभले आहेे.
साळाव पुलाची निर्मिती पुर्वी रेवदंडा एस.टी. बस स्थानकांतून सर्व ठिकाणी अलिबागसह मुंबई, ठाणा, पुणे आदीकडे कुच करणारा लांबपल्ल्याच्या एस.टी. बसेस प्रवासीवर्गाच्या सोयीसाठी उपलब्ध असायच्या. साळाव पुलाचे निर्मितीनंतर मुरूड एस.टी.डेपो अस्तित्वात आल्याने रेवदंडा एस.टी.बस स्थानक फक्त व्हायामार्गे म्हणूनच अस्तित्व राखून राहिले. त्यानंतर मुरूड (व्हाया रेवदंडा) अलिबाग-मुंबई, ठाणा, पुणे, शिर्डी तसेच अलिबाग-मुंबई, ठाणा, पुणे, शिर्डी (व्हाया रेवदंडा) मुरूड अश्या एस.टी.बसेस रेवदंडा स्थानकांतून जा-ये करत राहिल्या. परिणामी रेवदंडा एस.टी.बस स्थानकांचे महत्व आपोआप कमी झाले. हे रेवदंडा बस स्थानकांत प्रवासीवर्गास मुरूड व अलिबाग कडून ये-जा एस.टी बसेसची वाट पहाणे, एव्हढे साठी उपलब्ध राहिले.
अलिबाग व मुरूड डेपोसाठी रेवदंडा एस.टी.स्थानक फक्त मध्यवर्ती ठिकाण राहिले. येथील प्रवासीवर्गास मुरूड व अलिबाग कडून ये-जा करणार्या गाडयातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासीवर्गाचे सुध्दा हाल होऊ लागले, मुरूड अथवा अलिबाग कडून येणारी एस.टी.बसेस अगोदरच भरगच्च असते, त्यामुळे प्रवासीवर्गास एस.टी.बस मध्ये बसायला जागा शोधावी लागते. रेवदंडा मध्ये लांबपल्लाच्या एस.टी.बसेसना रिझर्वेशन सुविधा आहे, मात्र प्रवासीवर्ग मनासारखी जागा न मिळत नसल्याची नेहमीच तक्रार करतो.
प्रवासीवर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळाने अलिबागकडे जाण्यासाठी दर तासाने एक व लांबपल्लाच्या अनेक गाडया रेवदंडा एस.टी.बस स्थानकातून सोडण्यात येत असून प्रवासीवर्गासाठी सुयोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
देवराज राऊत, रेवदंडा एस.टी. वाहतुक नियत्रंक