| पनवेल |
रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंफनी या संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित बालकांना त्यांच्या वस्तीवर मोफत प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याहेतूने निधी संकलन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने 16 एप्रिल रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जादूची पेटी या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गीतकार मंदार चोणकर, हास्यजत्राफेम चेतना भट, नाट्यकलाकार कौस्तुभ दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते. या मुलांच्या दुपारच्या भोजनाची सोय व्हावी जेणेकरून शाळेत त्यांची नियमित उपस्थिती वाढेल या उद्देशाने या निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.